चंद्रपूर

Chandrapur Crime : चंद्रपुरात घरफोडी करणारा परप्रांतीय चोरटा एलसीबीच्या जाळ्यात, तुकूम भागातील गुन्ह्याचा उलगडा

२८ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : शहरातील तुकूम परिसरातील छत्रपतीनगर येथे नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरातून इलेक्ट्रिक साहित्य व मशिनरी लंपास करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) जेरबंद केले. पोलिसांनी आरोपीकडून विविध मशिनरींसह सुमारे २८ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

२८ ऑगस्ट रोजी रात्री छत्रपतीनगर येथील बांधकाम सुरू असलेल्या घरातून अज्ञात चोरट्याने कटर मशीन, ग्राइंडर मशीन, इलेक्ट्रिक व अन्य साहित्य लंपास केले होते. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अप.क्र. १०६०/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करताना पोलिसांना ससुर ऊर्फ कोलकाता साहजन मंडल (वय ३९, रा. फुटनगर, चंद्रपूर; मूळ रा. पश्चिम बंगाल) याच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता त्याने या चोरीची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून विविध कंपन्यांची ड्रिल मशीन, कटर मशीन, टायटन मशीन, रोटर मशीन, ग्राइंडर मशीन तसेच दरवाजाचे कब्जे व अन्य साहित्य असा एकूण २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई आणि सखोल तपासासाठी त्याला रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार व त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT