कुणाल पटेल  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Resort Owner Death | चिमूर तालुक्यात खळबळ: जंगल मिडोज रिसॉर्टच्या मालकाने जीवन संपवले

बहिणीचे फोन कॉल अनुत्तरित; कर्मचाऱ्याने खोली उघडताच धक्कादायक घटना उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

Jungle Meadows Resort Owner Death

चंद्रपूर : चिमूर : कोलारा–वन्यविलास रिसॉर्ट मार्गावरील जंगल मिडोज रिसॉर्टचे मालक कुणाल पटेल (वय ४५, रा. गुजरात) यांचा बुधवारी पहाटेच्या सुमारास रिसॉर्टमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. बहिणीचे वारंवार फोन करूनही पटेल यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्याने खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर ही घटना समोर आली. या घटनेने रिसॉर्ट परिसरासह चिमूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी कुणाल पटेल यांच्या बहिणीने त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी रिसॉर्टमधील एका कर्मचाऱ्याशी संपर्क साधला. कर्मचाऱ्याने पटेल यांच्या खोलीजवळ जाऊन पाहिले असता दरवाजा बंद होता.

त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा उघडून आत पाहणी केली असता कुणाल पटेल हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कुणाल पटेल यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे कॅन्सरने निधन झाले होते. त्यानंतर ते एकाकी जीवन जगत होते, तसेच ते नैराश्यात असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, रिसॉर्टसारख्या पर्यटनस्थळी मालकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. पटेल यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याचा तपास चिमूर पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT