Chimur Bus Stand ST Worker Death
चंद्रपूर : तरुण एसटी कर्मचाऱ्याने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना शनिवारी (दि. १७) सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास चिमूर बस स्थानक परिसरात उघडकीस आली. सुधीर भिलकर असे मृताचे नाव आहे.
चिमूर बस स्थानक परिसरात असलेल्या झाडाला गळफास घेऊन त्याने जीवन संपविले. सकाळी ही घटना बसमधील शाळेच्या विद्यार्थ्यांना आढळून आली. त्यांनी लगेच याची माहिती एस टी कर्मचाऱ्यांना दिली. कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती चिमूर पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शव शवविच्छेदना करीता चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविला. या घटनेमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.