मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांनी नागपूर विभागातील बल्लारशाह - सेवाग्राम विभागाची सविस्तर सुरक्षा तपासणी केली. pudhari photo
चंद्रपूर

Chandrapur : महाव्यवस्थापकांनी घेतला मध्य रेल्वेच्या 6 रेल्वे स्थानकांचा आढावा

Railway station: रेल्वेच्या  सुरक्षेची केली तपासणी

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म  वीर  मीना यांनी नागपूर विभागातील बल्लारशाह - सेवाग्राम विभागाची सविस्तर सुरक्षा तपासणी केली. यावेळी त्यांनी बल्लारशाह,चंद्रपूर,भद्रावती-माजरी,वरोरा व नागपूर रेल्वे स्थानकांची पाहणी केली. यावेळी रेल्वे विभागाचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक कुशकुमार मिश्रा, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक एस. एस. गुप्ता, मुख्य अभियांत्रिकी व्यवस्थापक रजनीश माथूर,सेक्शन कमर्शियल इंस्पेक्टर सुनील कुमार पंत,रेल्वे अधिकारी, विनायक गर्ग,अमन मित्तल, कृष्णा पाटील, मनोज कुमार,  कृष्णा नंदन,कृष्णा पाटील, केशव जैन यांची उपस्थिती होती.

बल्हारशाह येथे महाव्यवस्थापकांनीं रूट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय) केबिन आणि पॅनेल रूम,रिले/पॉवर युनिट, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) स्थानकावरील सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष,स्टेशन व्यवस्थापकाचे कार्यालय, क्रू लॉबी, क्रू रनिंग रूम,स्टेशनवरील पीआरएस काउंटर आणि प्रवाशांच्या विविध सुविधा, मर्यादित उंचीसह भुयारी मार्ग, बल्लारशाह येथे गुड्स शेड आणि रस्ता अपघात मद ट्रेन,अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे. तसेच आदीचे निरीक्षण केले. महाव्यवस्थापकांनीं कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. विद्यमान लोडिंग क्षमता साध्य करण्यासाठी आणि लोडिंग क्षमता वाढवण्याच्या योजनांवर चर्चा करण्यासाठी मालवाहतूक ग्राहकांशी संवाद साधला.

त्यानंतर महाप्रबंधक मीना यांनी चंद्रपूर स्थानकाची सविस्तर पाहणी केली.महाव्यवस्थापकांनी आमदार  किशोर जोरगेवार आणि  आमदार  सुधाकर आडबाले यांची भेट घेतली आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मीना यांनी कर्मचाऱ्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी आणि प्रवासी आणि मालवाहतूक ग्राहकांना सेवा वाढविण्यासाठी विभाग- विशिष्ट पुस्तिका देखील प्रकाशित केल्या गेल्या. चंद्रपूर नंतर मीना यांनी भांदक- माजरी,वरोरा,हिंगणघाट या रेल्वे स्थानकांना भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT