Bribe Case Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Bribe Case : ८ हजारांची मागणी, ३ हजारांवर तडजोड; महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना अटक

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सिंदेवाही येथील महावितरण उपविभाग कार्यालयात सापळा रचून सहाय्यक अभियंता अमोद संतोष रंदये (वय ३८) याला ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज बुधवारी(दि१) रंगेहात पकडले. आरोपीने दोन ग्राहकांच्या सोलर सिस्टिमच्या मीटर कनेक्शनसाठी रिलीज ऑर्डर काढून देण्याच्या बदल्यात एकूण ८ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत दोन ग्राहकांनी सोलर सिस्टिम बसविल्यानंतर महावितरणच्या मीटर कनेक्शनला परवानगी देण्यासाठी रिलीज ऑर्डर आवश्यक होती. त्यासाठी आरोपी सहाय्यक अभियंता अमोद रंदये यांनी प्रत्येकी ४ हजार रुपये असे एकूण ८ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत १ जुलै रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. कारवाईदरम्यान आरोपीने लाचेच्या रकमेत तडजोड करून ३ हजार स्वतः स्वीकारले आणि त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिजवार, पोलीस निरीक्षक प्रशांत केदार व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT