Brahmapuri Police Lost Mobile Returned Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Police | दिवाळीपूर्वी ब्रह्मपुरी पोलिसांची नागरिकांना अनोखी भेट; ४२ हरविलेले मोबाईल केले परत

सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून पोलिसांना मोबाईल शोधण्यात यश; मूळ मालकांच्या चेहऱ्यावर फुलले समाधान

पुढारी वृत्तसेवा

Brahmapuri Police Lost Mobile Returned

चंद्रपूर: हरविलेला मोबाईल पुन्हा मिळणे ही अनेकांसाठी आनंदाची बाब असते. ब्रह्मपुरी पोलिसांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला नागरिकांना अशीच आनंदाची भेट दिली आहे. सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून शोध घेत तब्बल ४२ हरविलेले मोबाईल शोधून काढण्यात ब्रह्मपुरी पोलिसांना यश आले. या सर्व मोबाईलचे मूळ मालकांना पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या हस्ते मोबाईल परत करण्यात आले. हरविलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी ब्रह्मपुरी पोलिसांचे आभार मानले.

ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात मोबाईल हरविल्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून मोबाईलचा शोध सुरू केला होता. ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीसह आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण ४२ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर दिवाळीच्या पूर्वसंध्येला संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे, मिलिंद नैताम, पोलीस अंमलदार प्रवीण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार आणि वशिष्ट रंगारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT