ATS action  PUDHARI
चंद्रपूर

ATS action | चंद्रपुरात ATS ची कारवाई; सोशल मीडियावरील फॉलोअर्समुळे विद्यार्थ्याची चौकशी

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँग व डोंगरी गँगशी संबंधित अकाउंट्स फॉलो केल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दहशतवादविरोधी पथक अर्थात Anti- Terrorism Squad (ATS) च्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँग आणि डोंगरी गँगशी संबंधित अकाउंट्स फॉलो केल्याप्रकरणी नागपूर ATS पथकाने गोंडपिपरी येथील एका विद्यार्थ्याची चौकशी केली. प्राथमिक तपासात कोणतेही आक्षेपार्ह अथवा संशयास्पद संबंध आढळून न आल्याने संबंधित विद्यार्थ्याला नंतर सोडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी मूळचा अहेरी येथील रहिवासी असून शिक्षणासाठी सध्या गोंडपिपरी येथे वास्तव्यास आहे. सोशल मीडियावर काही संशयित अकाउंट्सशी त्याचा संपर्क असल्याची माहिती ATS ला मिळाल्यानंतर नागपूर येथील ATS पथकाने त्याची चौकशी सुरू केली. तपासादरम्यान विद्यार्थ्याच्या मोबाईलमधील सोशल मीडिया अकाउंट्स, संपर्क तसेच ऑनलाइन हालचालींची पडताळणी करण्यात आली. विशेषतः पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँग आणि डोंगरी गँगशी संबंधित अकाउंट्स फॉलो केल्यामुळे ATS सतर्क झाली होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याचे कोणत्याही गुन्हेगारी किंवा राष्ट्रविरोधी घटकांशी संबंध आहेत का, याचा सखोल तपास करण्यात आला.

दरम्यान, चौकशीत कोणतीही संशयास्पद माहिती किंवा राष्ट्रविरोधी कारवायांशी संबंधित पुरावे आढळून आले नाहीत. त्यामुळे ATS ने विद्यार्थ्याला समज देऊन सोडून दिल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे मात्र गोंडपिपरी परिसरात चर्चांना उधाण आले असून सोशल मीडियावरील हालचालींबाबत युवकांनी अधिक सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT