शिकार्‍याचीच झाली शिकार! Pudhari File Photo
चंद्रपूर

Chandrapur News : ट्रॉलीखाली चिरडून ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : घुघुस येथील लॉईड मेटल्स लेबर कॉलनीजवळ बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक बसून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दुपारी सुमारे १२ वाजताच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, लॉईड मेटल्स कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण व बांधकामाचे काम सुरू आहे. घुघुस येथील कुंभार मोहल्ला निवासी सुरेश महादेव खोबरे (वय ५५) हे केबी कन्स्ट्रक्शन कंपनीकडे ट्रॅक्टर चालक म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे ते बांधकामस्थळावरील कचरा घेऊन डंपिंग पॉईंटवर गेले होते.

कचरा खाली करण्यासाठी त्यांनी ट्रॉली उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॉलीची हायड्रॉलिक यंत्रणा व्यवस्थित काम करत नसल्याने त्यांनी खाली उतरून ट्रॉलीची तपासणी सुरू केली. त्याचवेळी अचानक ट्रॉली खाली कोसळली आणि तिची जोरदार धडक त्यांना बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ सुरेश खोबरे यांना उपचारासाठी घुघुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांनी सायंकाळी घुघुस पोलीस ठाण्यात धाव घेत दोषींवर कारवाई करण्यासह योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी करणारे निवेदन पोलिसांना सादर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT