Chandrapur Accident News
चंद्रपूर : रस्ता ओलांडत असताना एका 19 वर्षीय तरूणाला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारी (७ मे) ला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास राजुरा-कोरपना राष्ट्रीय महामार्गावरील कातलाबोडी फाट्या जवळ घडली.
अमीर शेख (१९,रा. चनापुर ,.नांदेड) असे मृतकाचे नाव आहे. तो एका सिमेंट ट्रकवर क्लीनर म्हणून आला होता. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीर शेख हा सिमेंट ट्रकवर क्लिनर म्हणून कार्यरत होता. आज बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्याचा ट्रक राजूरा कोरपना मार्गावरील कातलबोडी फाट्याजवळ धाब्यावर जेवन करण्यासाठी थांबला होता.
तो लगतच्या धाब्यातून पोळी आणण्यासाठी गेला होता. पोळी घेऊन येत असताना रस्ता ओलांडत असताना कोरपना गडचांदूर कडून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्याला जबर धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच्या पाय, डोके, हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कोरपना पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे पाठविण्यात आले. सदर तरूण हात अत्यंत गरीब परिस्थतीचा होता. त्यामुळे घर चालविण्यासाठी ट्रकवर क्लिनरचे काम करीत होता.