चंद्रपूर

चंद्रपूर : नागभीड तालुक्यात रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू 

अविनाश सुतार
चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चांदा फोर्ट गोंदिया मार्गावरील नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा गावाजवळ रेल्वेच्या धडकेत एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२७)  सकाळी उघडकीस आली आहे.
चंद्रपूर- गोंदिया मार्गावरील नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा गावाजवळ आज सकाळी रेल्वे लाईनवर कामगार काम करण्यासाठी गेले असता त्यांना रेल्वे रुळाच्या बाजूला पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती जवळील गावातील नागरिकांना होताच नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली. कामगारांनी सदर घटनेची माहिती नागभीड वनविभागाला दिली.
वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होवून मृतदेह ताब्यात घेतला आहे. प्राथमिक पाहणीत रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रेल्वे मार्ग ओलांडताना त्याला धडक लागली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. रेल्वेच्या धडकेत वन्यप्राणी मृत्यूमुखी पडण्याच्या घटनांत वाढ झालेली आहे. वन्यप्राण्यांच्या जीव वाचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्या, अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.
हेही वाचा 
SCROLL FOR NEXT