चंद्रपूर

चंद्रपूर : सिंदेवाहीत तालुक्यात विद्युत शॉक लागून पट्टेदार वाघाचा मृत्यू

backup backup

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : सिंदेवाही तालुक्यात एका पट्टेदार वाघाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली. सिंदेवाही  शहरापासून दोन किमी अंतरावरील मेंढामाल (मेंढाचक) नियत क्षेत्रात डोंगरगाव गट नंबर 164 मध्ये वाघाचा मृत्तदेह आढळून आला.

सिंदेवाही  शहरापासून दोन किमी अंतरावरील मेंढामाल (मेंढाचक) नियत क्षेत्रात डोंगरगाव गट नंबर 164 मध्ये आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास वैष्णवी देवानंद निकुरे यांच्या शेताच्या पट्टेदार वाघाचा मृत्तदेह काही लोकांना आढळून आला. सदर घटनेची माहिती वन विभागा देण्यात आली. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार शेतशिवारात ज्या स्थितीत मृतदेह आढळुन आले आला त्यावरून वाघाचा विद्युत  प्रवाहाने मृत्यू पावला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी वन विभागाची टीम, विद्युत विभागाची टीम, दाखल झाली असून सखोल चौकशी करून एका संशयित व्यक्तीला वन विभागाने ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी वरिष्ठ वनअधिकारी एम बी चोपडे, सहाय्यक वनरक्षक आर, एन हजारे, पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे, एन टी सी चे प्रतिनिधी बंडू धोत्रे, यश कायरकर, मुख्य वनरक्षक चे प्रतिनिधी विवेक करंबेकर, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सुरपाम, डॉक्टर शालिनी लोंढे, विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकारी आर एम गायधने, वनक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, चंद्रपूर विद्युत विभाग अधिकारी, पोलीस विभागाची चम्मू उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT