Chandrapur Tiger Attack File Photo
चंद्रपूर

Chandrapur Tiger Attack: चांदगावात चार वर्षांच्या मुलावर वाघाच्या पिल्लाचा हल्ला; चुलत भावामुळे वाचला जीव

ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदगाव येथे गावातच एका चार वर्षांच्या बालकावर पट्टेदार वाघाच्या पिल्लाने हल्ला केल्याची घटना बुधवारीसायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

मोहन कारंडे

Chandrapur Tiger Attack:

चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदगाव येथे गावातच एका चार वर्षांच्या बालकावर पट्टेदार वाघाच्या पिल्लाने हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. २८ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मयंक अशोक वलके असे जखमी बालकाचे नाव आहे.

मयंक याचा चुलत भाऊ रोहित वलके याने प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने वाघाच्या पिल्लाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या हल्ल्यात मयंक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील क्रिस्टानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदगाव येथील रोहित वलके हा आपल्या आत्याच्या घरी जात होता. त्याच्या मागून त्याचा चार वर्षांचा चुलत भाऊ मयंक येत होता. गावातील आत्याच्या घराच्या पायरीवर पोहोचताच दबा धरून बसलेल्या वाघाच्या पिल्लाने मयंकवर हल्ला केला. बालकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून रोहितने मागे वळून पाहिले असता वाघाचे पिल्लू मयंकवर हल्ला करत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रोहितने जोरजोरात आरडाओरड केली. त्यामुळे वाघाच्या पिल्लाने तेथून पळ काढला. रोहितने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मयंकचा जीव वाचला; मात्र या हल्ल्यात तो जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी ए. आर. कन्नमवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी बालकाची भेट घेतली. तसेच पोलिस प्रशासनानेही रुग्णालयात भेट देऊन घटनेची चौकशी सुरू केली आहे.

गावातच वाघाच्या पिल्लाने बालकावर हल्ला केल्याने चांदगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या घटनेची दखल घेऊन परिसरात आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT