चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गोंडपिपरी महामार्गावरील देवई फाट्याजवळ भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (दि.14) सकाळच्या सुमारास घडला. नाना जयराम कुबडे असे मृत्तकाचे नाव आहे.ट्रक चालकास पोलिसांनी अटक केली आहे बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गोंडपिपरी महामार्गावरील देवई फाट्यासमोरील वळणावर क्रमांक (एमएच 33 टी 4653) ट्रकची (एमएच 34 बी टी 9418) स्कूटीला जबर धडक बसली. यामध्ये नाना जयराम कुबडे यांचे डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर रामप्रसाद मधुकर भुजगवार हा इसम गंभीर जखमी झाला.
सदर अपघाताची माहिती कोठारी मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. तोवर दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला होता. तर अन्य सहकारी जखमी अवस्थेत आढळून आला. मृतकाचे मोबाईलवरून त्याची ओळख पटली. नाना जयराम कुबडे असे मृतकाचे तर रामप्रसाद मधुकर भुजगवार हे जखमीचे नाव असून दोघेही राजुरा येथील रहिवासी आहेत. पोलीसांनी लगेच जखमीस ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे भरती करण्यात आले आहे. अपघातानंतर करून पळून गेलेल्या ट्रकचा चालकाला गोंडपीपरी पोलीसांनी अटक केली आहे.