चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूरचे दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचा मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप त्यांच्या आई वत्सला धानोरकर यांनी केलाय. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आई वत्सलाताई धानोरकर यांच्या आईने केलेल्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. माझ्या मुलाचे म्हणजे बाळू धानोरकर यांचे हे जाण्याचे वय नव्हते, त्याच्या मृत्यूमागे घातपात आहे, असा आरोप त्यांनी केलाय.
सोबतच त्यांनी मृत्यूच्या कारणांची चौकशीची मागणी निवडणूक झाल्यानंतर करणार असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे. मात्र या घातपातामागे कोण आहे?, हे त्यांनी सांगितले नाही. बाळू धानोरकर यांचे सख्खे मोठे बंधू यावेळी वंचितच्या तिकिटावर वरोरा क्षेत्रातून लढत देत आहेत. बाळू धानोरकर यांच्या आई वत्सलाताई मोठ्या मुलाचा प्रचार करीत आहेत. तर दुसरीकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे हे काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा लढवत आहे, त्यामुळे वत्सलाताई धानोरकर यांनी केलेल्या आरोपांना राजकीय किनार आहे का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. (Maharashtra election 2024)