चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया द्वारे घेण्यात येणाऱ्या सी ए इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.11) लागला. या परिक्षेमध्ये चंद्रपूर येथील आदित्य दिलीप झाडे यांनी या परिक्षामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
देशामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून वर्षातून दोनदा घेतली जाते. यामध्ये मोजकेच विद्यार्थी यश मिळवतात. सीए फाउंडेशन परीक्षा पास केल्यानंतर एक वर्षाची तयारी करून सी इंटरमिजिएट परीक्षा द्यावी लागते.दोन्ही ग्रुप ची परीक्षा एकाच वेळी देता येते. नव्या अभ्यासक्रमानुसार पहिल्या ग्रुपमध्ये तीन व दुसऱ्या ग्रुप मध्ये तीन अशा सहाशे गुणांची परीक्षा होते. यंदा घेण्यात आलेल्या परिक्षेत 684 विद्यार्थ्यांपैकी 148 विद्यार्थी यशस्वी ठरले.
यामध्ये चंद्रपूरच्या आदित्यचा समावेश आहे. त्यांनी 600 पैकी 315 गुण संपादन केले. यापूर्वी त्यांनी वाणिज्य विद्या शाखेतून बारावीची परीक्षा 89.00 टक्के गुणांनी उत्तीर्ण केली. त्याच वर्षी सलग सीए फाउंडेशन सुद्धा 78.25 टक्के प्राप्त करून परीक्षा पास केली. नागपूर सेंटर मधून दोन्ही ग्रुपची परीक्षा देऊन केवळ तीनच विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. यात आदित्यने यश मिळविले आहे. याचबरोबर त्यांनी बीकॉम फर्स्ट इयर ची सुद्धा परीक्षा दिली आहे.आदित्यने आपल्या यशाचे श्रेय त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे वडील इंजिनियर दिलीप झाडे, आई कुंदा झाडे व शिक्षकांना दिले आहे.