आरोही कमलाकर डुकरे 
चंद्रपूर

Chandrapur News: आईच्या बोटापासून नागपूरच्या व्यासपीठापर्यंत; आरोहीची दमदार झेप

१३ वर्षीय आरोही डुकरेची ‘डान्स आयकॉन ऑफ नागपूर’च्या ब्रँड अँम्बेसेडरपदी निवड

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : आई आरतीचे बोट धरून नृत्याची पहिली पावले टाकणाऱ्या वरोरा येथील १३ वर्षीय आरोही कमलाकर डुकरे हिने आपल्या नृत्यकौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध नृत्य स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या आरोहीची ‘डान्स आयकॉन ऑफ नागपूर’च्या ब्रँड अँम्बेसेडरपदी निवड झाली आहे.

नागपूर येथे २९ ऑगस्ट रोजी सखी सहेली फाउंडेशन आणि विश्वविद्या बहुउद्देशीय जनकल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘द किंग अँड क्वीन ऑफ श्रावण – सीझन २’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात आरोहीच्या ब्रँड अँम्बेसेडरपदी निवडीची घोषणा करण्यात आली.

लहानपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या आरोहीने नियमित सराव, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर नृत्य क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अवघ्या १३व्या वर्षी तिने विविध नृत्य स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पुरस्कार मिळवले आहेत. आरोहीच्या प्रत्येक सादरीकरणातून तिचे नृत्यावरील प्रेम, मेहनत आणि आत्मविश्वास प्रकर्षाने जाणवतो. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत ‘डान्स आयकॉन ऑफ नागपूर’च्या ब्रँड अँम्बेसेडरपदाची जबाबदारी तिच्यावर सोपविण्यात आली आहे.

ही निवड आरोहीच्या पुढील नृत्यप्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. कार्यक्रमातील मान्यवरांनी आरोहीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आई आरतीचे बोट धरून सुरू झालेला आरोहीचा नृत्यप्रवास आता नागपूरच्या प्रतिष्ठित व्यासपीठापर्यंत पोहोचला आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण वरोरा शहराचा गौरव झाला असून, तिची वाटचाल शहरातील नवोदित कलाकारांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT