चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 70- राजूरा व 74 चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी करण्यात येणार आहे. राजुरा मतदार संघाची 8, 12 व 18 नोव्हेंबर तर 9, 13 व 19 नोव्हेंबर 2024 रोजी चिमूर मतदार संघाची तपासणी केली जाणार आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. 70 राजुरा मतदार संघाची प्रथम खर्च लेखा तपासणी शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी सोमवार दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह, राजुरा येथे करण्यात येईल. 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक आदित्य बी. हे तपासणीकरीता उपस्थित राहतील.(Maharashtra assembly poll)
74 चिमूर मतदार संघात प्रथम खर्च लेखा तपासणी शनिवार दि. 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी बुधवार, दि. 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी मंगळवार दि. 19 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपकोषागार कार्यालय, चिमूर येथे करण्यात येईल. 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक धर्मेंद सिंग हे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहतील.
जे उमेदवार खर्चाचे लेखे तपाासणीकरीता सादर करणार नाहीत, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.