चंद्रपूर

चंद्रपुरात २० लाखाच्या अंमली पदार्थाची तस्करी; सराईत आरोपीला अटक

backup backup
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपुरात अंमली पदार्थासह एका सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने सुमारे वीस लाखांच्या अमली पदार्थांसह अटक केली. मॅफेड्रान पॉवडर अंमली पदार्थासह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे ही  कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
सोमवारी (दि. ३०)  दोन व्यक्ती खासगी कारने नागपूरहून येत एम. डी. ड्रग्ज पॉवडर विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीची पडताळणी करून वरिष्ठांना माहिती देण्यात आली. यानंतर पडोली पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवली. दरम्यान एमएच-34- बीआर-5951 या क्रमांकाची चारचाकी नागपूरकडून चंद्रपूरच्या दिशेने येताना दिसली. या वाहनास थांबवून झडती घेतली असता, चालकाच्या बाजूला बसलेला आरोपी शाहरूख मतलुब खान (वय 28 वर्ष, रा. शालीकग्राम नगर, घुग्घुस) यांच्या हातातील पिशवीमध्ये पांढऱ्या भुरकट रंगाची पॉवडर (मॅफेड्रान) वजन आढळून आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 19 लाख 80 हजार रूपये किमतीच्या मद्देमालासह एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.
या कारवाईत दोन्ही आरोपी  शाहरूख मतलब खान (वय 28 वर्ष), साहील ईजराइल शेख (वय 28 वर्ष दोघेही रा. शालीकग्राम नगर घुग्घुस) यांना अटक करुन 198 ग्राम एमडी पॉवडर, दोन मोबाईल, एक कार (एमएच-34- डीआर-5951), आरोपीचे अंग झडतीत 2200 रूपये आणि  लोखंडी तलवार किंमत पाचशे रूपये असा एकुण 28 लाख 2 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील दोन्ही आरोपींनी अटक करून पडोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षकश्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि नागेश चतरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि अतुल कावळे, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, प्रशांत नागोसे, भुषण बारसिंगे तसेच पो. स्टे. सायबर चे छगन जांभुळे, अमोल सावे, प्रशांत लारोकर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT