विदर्भ

चंद्रपूर : भद्रावती येथे एकाच रात्री दोन घरफोड्या; घटना सिसीटीव्हीत कैद

backup backup

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाकरता गेलेल्या धनपाल व कृषी पर्यवेक्षकाच्या घरी  चोरट्यांनी साडे सतरा हजारांच्या रोख रकमेसह साडेपाच लाखाचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना २६ जानेवारीच्या पहाटेला उघडकीस आली आहे. घराच्या समोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाच आरोपींनी केलेली चोरी कैद झाली आहे. भद्रावती पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी मात्र, पसार झाले आहेत.

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त देऊळ कालणीतील राजेश महातव हे राजुरा येथे तर पत्नी ही चंद्रपूरला गेलेली होती. त्यामुळे घराला कुलूप लावून घर बंद करण्यात आले होते. याच संधीचा फायदा काही चोरट्यांनी घेतला. रात्री साडेतीनच्या सुमारास पाच चोरट्यांनी राजेश महातव यांच्या घरात प्रवेश करून रोख रक्कमेसह पाच लाखांचा ऐवज लंपास केला. तर याच घराजवळील कृषी विभागात पर्यवेक्षक असलेले उमाकांत बोधे यांच्या घरातून ५८ हजाराचा सोन्याचा ऐवज लांबविला. बोधे गडचिरोली जिल्ह्यात नोकरीवर आहेत. त्यामुळे ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी पूर्वसंध्येला गेले होते. तर घरचे मंडळीही बहिणीकडे बाहेर गावी गेले होते. घनश्याम नगरीत देऊळ कॉलनीत एकाच रात्री घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याकरीता फिर्यादी गेल्यानंतर त्यांची तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. लोकप्रतिनिधींना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली. मात्र, रात्रीच घरफोड्या केल्यानंतर आरोपी पसार झालेत. याच परिसरात सिसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामध्ये चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामध्ये पाच आरोपी चोरी करताना दिसून येत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची स्थिती जाणून घेतली.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT