विदर्भ

चंद्रपूर : गोसेखुर्दच्या उजव्या कालव्यामुळे लखमापूर तलाव फुटला

backup backup

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : संतंतधार पावसामुळे प्रवाहीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) परिसरातून गेलेल्या गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याची पाळ फुटली. त्यामधील पाणी लगतच्या लखमापूर तलावात शिरले. त्यामुळे तलावाचा ओव्हर फ्लो फुटून वाहून गेलेल्या पाण्यामुळे सतीश सुधाकर पोशट्टीवार व त्यांच्या कुटूंबियांच्या चाळीस एकर शेतात पाणी घुसल्याने पिकासह शेती खरडून गेल्याने सुमारे दोन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात तिन दिवसांपासून संतंतधार पाऊस सुरू आहे. शनिवारच्या रात्री मुसळधार पाऊस कोसळल्याने एकाच रात्री नदी नाले तलाव, लघू व मध्यम सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली. मुसळधार पावसाचा वेग वाढतच राहल्याने नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) परिसरात निर्माणाधीन असलेल्या गोसेखूर्दच्या उजव्या कालव्याची पाळ फुटली. त्यामुळे तो पाणी लगतच्या लखमापूर परिसरातलील तलावात घुसला. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी वाढून ओव्हर फ्लो फुटून लगतच्या निलेश पोशट्टीवार यांच्या शेतात घुसला. त्यामुळे नुकताच रोवणे करण्यात आलेले धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकासह शेतजमिनही खरडली आहे. उजवा कावा व तलावाच्या फुटलेल्या ओव्हर फ्लोमधून अजूनही पाण्याचा विसर्ग होत आहे.

लखमापुर येथील सर्वे नं. 120/1, 120 / 2, 120/3, 120/4, 120/5, 119, 179, 176 मध्ये पाणी घूसल्याने शेती हि पूर्णत: खरडून गेली आहे. धानपिकाचे दहा एकरातील नुकसान झाले आहे. सदर शेती ही सतीश सुधाकरराव पोशट्टीवार आणि त्यांच्या इतर कुटूंबियांच्या मालकीची आहे. सुमारे चाळीस ते पन्नास एकर शेतीमध्ये नुकतीच धानपिकाची लागवड करण्यात आली होती. अतिप्रवाहीत पाण्यामुळे तलावातील गाळ, माती व चिखल शेतजमीन मध्ये साचल्याने शेती पिक घेण्यास योग्य राहिली नाही. याच शेतजमिनीत आंबा, पेरू, लिंबू, बांबू, सागवान व इतर जातींचे झाडे मागील 45 वर्षापासुन होते. ते शुध्दा जमीनदोस्त झालीत. नैसर्गिक आपत्तीमुळे पोशट्टीवार कुटूंबीयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे शेतजमीन, झाडे व लागवडी खालील क्षेत्राचे 2 कोटींचे घरात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याची पाळ फुटल्याने आणि पाऊस अधूनमधून सूरूच असल्याने संपूर्ण पाणी हा लखमापूर तलावामर्गाने शेतात येत आहे. सध्या शेतजमिनीच्या झालेल्या परिस्थीनुसार जमीन लागवड करण्यास योग्य राहिलेली नाही. संभाव्य धोका टाळण्याकरीता तातडीने उजव्या कालव्याची फुटलेली पाळ दुरूस्त करण्यात आली नाही तर संपूर्ण पाणी लखमापूर तलावामार्गे पोशट्टीवार यांचे शेतातून जात राहणार आहे. त्यामूळे तलावाचा वाहून गेलेला ओव्हर फ्लोचीही दुरूस्ती तातडीने करणे आवश्क असल्याचे शेतकऱ्याचे म्हणने आहे. पाऊस असाचा सुरू राहीला तर मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

प्रशासनाने तातडीने उपाय योजना कराव्यात : आसावरी पोशट्टीवार

दोन दिवसाच्या संतंतधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुन्हा दोन महिने पावसाळा आहे. पुढचा धोका टाळण्याकरीता प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात. गोसेखुर्दच्या उजव्या कालवा फुटलेला असल्याने तातडीने पहिल्यांदा दुरूस्त करावे. त्यानंतर लखमापूर तलावाच्या फुटलेल्या पाळीचे सशक्तीकरण करावे. शासनाने प्राधान्याने याकडे लक्ष देऊन दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करावी व नुकसान भरपाई द्यावी आी मागणी प्रगतशील महिला शेतकरी आसावरी पोशट्टीवार यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT