विदर्भ

चंद्रपूर : जिल्हा कारागृह अधीक्षकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

अमृता चौगुले

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या कारागृह अधीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने कारागृह पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. महेश माळी असे कारागृह अधिक्षकाचे नाव आहे.

चंद्रपुरातील जिल्हा कारागृहात महेश माळी हे अधीक्षक म्‍हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी कारागृह परिसरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेची माहिती कारागृहातील काही कर्मचाऱ्यांना होताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्‍यामूळे कारागृह अधीक्षकाचा आत्महत्येचा प्रसंग टाळला. मात्र या घटनेने कारागृह पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

कारागृह अधीक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न का केला. याविषयी अद्याप माहिती पुढे आलेली नाही. या घटनेविषयी पोलिसांनी तपासला सुरूवात केली आहे. कारागृहातील कर्मचारी वेळीस धावून गेल्याने कारागृह अधीक्षकासोबत घडणारा मोठा अनर्थ टळला असला तरी कारागृह अधिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न का केला? अशीही चर्चा कारागृहातील पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.

SCROLL FOR NEXT