Buldhana bus fire Pudhari photo
बुलढाणा

Buldhana bus fire: समृद्धी महामार्गावर लोणार जवळ खासगी बस जळून खाक

सुदैवाने सर्व ३५ प्रवासी बचावले

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर लोणारजवळ खासगी प्रवासी बसला लागलेल्या भीषण आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने बसमधील सर्व ३५ प्रवासी सुरक्षित बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुण्याहून पुसदकडे निघालेल्या खासगी प्रवासी बसला (क्र. एमएच ३८-एफ ३८९९) समृद्धी महामार्गावर अचानक आग लागली. ही घटना शनिवारी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता लोणार तालुक्यातील शिवणी पिसा शिवारात, चॅनेल क्रमांक २९६ जवळ घडली.

बसला आग लागल्याचे मागून येणाऱ्या वाहनचालकाने लक्षात आणून दिल्यानंतर बसचालक व कर्मचाऱ्यांनी तत्काळ बस थांबवली. प्रसंगावधान राखत सर्व ३५ प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मात्र काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केल्याने बस पूर्णतः जळून खाक झाली असून केवळ सांगाडा उरला आहे. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस, महामार्ग पोलीस तसेच समृद्धी महामार्ग प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

दरम्यान, प्रवाशांच्या रोषाच्या भीतीने बसचालक आकाश जमदाडे (वय ३२, रा. पुसद) हा घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मेहकर पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT