गजानन महाराज प्रकटदिनी लाखो भाविकांची मांदियाळी 
बुलढाणा

Gajanan Maharaj Prakatdin : गजानन महाराज प्रकटदिनी लाखो भाविकांची मांदियाळी

संतनगरीत दोन लाख भाविकांनी घेतला महाप्रसाद; 1,029 दिंड्यांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा ः संत नगरी शेगावात श्रींचा 148 वा प्रगट दिन महोत्सव ‌‘गण गण गणात बोते‌’च्या गजरात भक्तिभावाने साजरा झाला. लाखो भाविकांनी यावेळी श्रींच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. अभंगाचे गायन करीत टाळ-मृदंगाच्या निनादात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रींचा 148 वा प्रकट दिन उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी सुमारे दोन लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रकट दिन उत्सवात 1,029 भजनी दिंड्यांचा सहभाग लक्षणीय ठरला.

श्रींचा प्रकट दिन उत्सवाला 2 फेब्रुवारी सोमवारी माघ प्रतिपदेपासून सुरुवात झाली व आज श्रींच्या प्रकटदिनी 8 फेब्रुवारी रविवारी माघ सप्तमीला सकाळी 10 वाजता महारुद्र स्वाहाकार यज्ञयागाची पूर्णाहूती व अवभृतस्नान ब्राह्मण वृद्धांच्या मंत्रोच्चारात व सेवाधारी विश्वस्तांच्या उपस्थितीत यज्ञ यागाची पूर्णाहूती झाली. सकाळी 10 ते 12 वाजतादरम्यान ह.भ.प. भरत बुवा पाटील यांचे कीर्तन झाले. दुपारी 12 वाजता मंगल वाद्यांच्या गजरात सनई चौघड्यांच्या मधुर आवाजात हजारो भाविकांनी ‌‘जय गजानन श्री गजानन‌’ ‌‘गण गण गणात बोते‌’ मंत्राचा नाम जप केला. तसेच अनंत कोटी ब्रम्हांडनायक शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय असा जयघोष करीत पुष्पवृष्टी केली. त्यानंतर श्रींची महाआरती करण्यात आली. दुपारी 4 वाजता नगर परिक्रमा झाली. यात श्रींची पालखी अश्व, रथ, मेण्यासह, पताकाधारी, टाळकरी, वारकरी, हजारो भाविक पालखीसोबत सहभागी झाले होते. श्रींच्या रजत मुखवट्याचे विधिवत पूजन संस्थानचे सेवाधारी ब्राह्मण वृदांच्या हस्ते करण्यात आले. श्रींची पालखी सायंकाळी मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर महाआरती झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT