देऊळगावराजा ः महसूल विभागाने जप्त केलेले टिप्पर.  pudhari photo
बुलढाणा

Illegal sand transport : अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई

महसूल विभागाच्या कारवाईत टिप्पर जप्त

पुढारी वृत्तसेवा

देऊळगाव राजा ः तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर महसूल विभागाने कारवाई करून एक टिप्पर जप्त केले आहे. ही कारवाई 23 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 4.30 वाजताच्या सुमारास चिंचखेड ( ता. देऊळगाव राजा) येथे करण्यात आली.

तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महसूल पथकाने तत्परता दाखवत संबंधित टिप्पर अडवून ताब्यात घेतला. जप्त केलेला टिप्पर पुढील कार्यवाहीसाठी अंढेरा पोलिस स्टेशन ठेवण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान महसूल सेवक कविता खरात व संदीप चेके हे उपस्थित होते. त्यांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी स्पष्ट केले की, तालुक्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभाग सातत्याने कारवाई करत असून अशा धडक मोहिमा पुढेही सुरूच राहणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT