शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 'राजमाता जिजाऊ' यांचे नाव, शासनाचा अधिकृत निर्णय निर्गमित file photo
बुलढाणा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 'राजमाता जिजाऊ' यांचे नाव, शासनाचा अधिकृत निर्णय निर्गमित

या विषयी आग्रही मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ९ मार्च रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती.

पुढारी वृत्तसेवा

Government Medical College Named After 'Rajmata Jijau'; Official Government Order Issued

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : बुलढाणा येथे अलिकडेच सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने अधिकृत आदेश आज निर्गमित केला आहे.

'राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा 'असे नामकरण झाल्याने जिल्हावासिय नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे जन्मस्थळ व छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ सिंदखेडराजा येथे असल्याने जिल्हाभूमी बुलढाण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 'राजमाता जिजाऊ'यांचे नाव देणे औचित्याचे व गौरवास्पद ठरेल अशी आग्रही मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ९ मार्च रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती.

मंत्री जाधव यांनी केलेला पाठपुरावा व जनभावनेचा आदर करून शासनाने 'राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा 'असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.तत्पूर्वी बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी केलेली होती. अखेर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रयत्न सरस ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT