Buldhana News : चोरीतील साडेचार लाखांचे सोने केले परत file photo
बुलढाणा

Buldhana News : चोरीतील साडेचार लाखांचे सोने केले परत

अंढेरा पोलिसांची कामगिरी, न्यायालयाचा आदेश

पुढारी वृत्तसेवा

Gold worth ₹4.5 lakh from the theft returned

देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवा : जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी तपास करून चोरीस गेलेला मौल्यवान मुद्देमाल जप्त करणाऱ्या अंढेरा पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशान्वये तो मुद्देमाल मूळ मालकांना परत दिला आहे. यामुळे पीडित कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पोलीस स्टेशन अंढेरा येथे दाखल असलेल्या असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात तपासा दरम्यान ७८. ५७० ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले होते. या सोन्याची अंदाजे किंमत ४ लाख ७७ हजार रुपये इतकी आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर हा मुद्देमाल फिर्यादी दत्तू विष्णू खरात, भारत ताकतोडे व शिवनारायण ताकतोडे (रा. बायगाव बु., ता. देऊळगाव राजा) यांना सुपूर्द करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती मनिषा कदम यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना सोन्याचा मुद्देमाल परत करण्यात आला. अनेक महिन्यांनंतर चोरीस गेलेली मालमत्ता परत मिळाल्याने संबंधितांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT