बुलढाणा

बुलढाणा : लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात पाच दिवस सूर्यकिरणोत्सव

Shambhuraj Pachindre

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : उल्कापातामुळे निर्माण झालेल्या खाऱ्या पाण्याच्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे वैज्ञानिक व अध्यात्मिकदृष्ट्या महत्व कायम आहे.सरोवर परिसरात देवीदेवतांची सुरेख वास्तूकलेचे अदभूत नमुने असलेली ३२ पौराणिक मंदिरे आहेत.यातीलच एक दैत्यसुदन मंदिर अर्थात श्री विष्णूचे प्राचीन मंदिर असून दरवर्षी १४ ते १९ मे या पाच दिवसांत सकाळी ११.१० ते ११.२० अशी १०मिनिटे विष्णू मुर्तीच्या मुखकमलांवर ललाटस्थानी सुर्यकिरणांचा नैसर्गिकरीत्या अभिषेक होतो. हे मनोहारी दृष्य पाहण्यासाठी भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी होते.

मातीच्या ढिगाऱ्याखाली दडलेले हे प्राचीन मंदिर इ.स.१८७८मध्ये उत्खननामुळे दुस-यांदा जगासमोर आले. लोणारचे हे विख्यात दैत्यसुदन मंदिर उत्तर चालुक्य राजा विजयादित्य अर्थात विक्रमादित्य सहावे यांनी त्रिभुवनकीर्ति नावाच्या शिल्प तज्ञांकडून ११व्या शतकात नवरात्र तांत्रिक पध्दतीने बांधलेले आहे असे सांगितले जाते.

या दैत्यसुदन मंदिराला नक्षीदार कोरीव दगडी खांब आहेत.मंदिराच्या भिंतीवरील विविध कलात्मक शिल्पांतून अध्यात्मिक व पौराणिक संदर्भ प्रतित होतात. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील शंख, चक्र व गदाधारी श्रीविष्णूंची मुर्ती आणि त्यांच्या पायाखाली लवणासूर राक्षसाचा वध होतांनाचे शिल्प दिसते. श्री विष्णू मुर्तीवरील किरणोत्सवाला १४मे पासून सुरूवात झाली आहे. १९मे पर्यंत म्हणजेच आणखी दोन दिवस ही पर्वणी राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT