देऊळगाव राजा : पोलिसांनी जप्त केलेले वाहन.  pudhari photo
बुलढाणा

Illegal Liquor Transport : अवैध दारू वाहतूकप्रकरणी तब्बल पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

देऊळगाव राजा : देशी दारूसह वाहन, मोबाईल जप्त करून गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

देऊळगाव राजा : अवैधरीत्या दारूची वाहतूकप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत देशी दारू, वाहन व मोबाईलसह असा ३ लाख ७५ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस हेडकॉन्स्टेबल माधव कुटे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने सिनगाव जहाँगीर-मेव्हणाराजा मार्गावर मेव्हणाराजा गावाकडून येणारी (एमएच ०५-एएस-६६८५) क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार थांबवून तिची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान वाहनामध्ये 'सखू संत्रा' कंपनीच्या देशी दारूचे सात बॉक्स आढळून आले. या बॉक्समध्ये १८० मिली क्षमतेच्या ३३६ सीलबंद बाटल्या असून त्यांची किंमत ३० हजार २४० रुपये असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी प्रदीप कारभारी इंगळे (३२), प्रमोद ऊर्फ बाळू नारायण लताड (२०), जब्बारखा बशिरखा पठाण (३५) आणि ज्ञानेश्वर शेषराव खरात (सर्व रा. वाघुळ, ता. जि. जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींकडून दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार, दोन मोबाईल आणि दारूसाठा असा एकूण ३.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या पथकामध्ये पोहेकॉ राम गिते, माधव कुटे, भास्कर सानप आणि चालक पोहेकॉ सुभाष मुंढे यांचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT