बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील पंधरा गावांत नागरिकांना अचानकपणे टक्कल पडण्याचा प्रकाराने खळबळ उडवून दिली होती. तीन महिन्यानंतर अजूनही या संदर्भात नेमकं निदान लागलेलं नाही, याच प्रकरणात आता दुसरा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या नागरिकांची केस गळती झाली होती, त्याच नागरिकांच्या हातापायाच्या नखांची गळती होत आहे. या रहस्यमय आजाराने नागरिकांमध्ये चिंता वाढली असून या संपूर्ण प्रकरणाला शासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.