Lonar Yoga Festival Pudhari
बुलढाणा

Trikonasana World Record | योग महोत्सवात एकाच वेळी ६ हजार साधकांनी केले त्रिकोनासन: 'एशियन बुक ऑफ इंडीया मध्ये' विक्रमाची नोंद

आयुष मंत्रालयाच्या वतीने जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठावर मंगळवारी (दि.७) योग महोत्सवाचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

Lonar Yoga Festival

बुलढाणा : आंतरराष्ट्रीय योग दिनाला ७५ दिवस राहिल्याच्या पृष्ठभूमीवर, योगाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिने केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठावर मंगळवारी (दि.७) योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी योग महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी आयुष विभागाच्या सहसचिव मोनालिसा दास, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, आयुक्त रमेश चौहाण, मोरारजी देसाई योग संस्थेचे डॉ. काशिनाथ,लोणारच्या नगराध्यक्षा मीराताई मापारी, आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी संघटनेचे अनंत बिरादार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जाधव म्हणाले,आज जगासमोर असलेल्या गैर-संचारी रोगांच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी योग अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतो. नियमित योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि तणाव यांसारख्या अनेक समस्यांवर नियंत्रण मिळवता येते. 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' व 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'२०२६ मध्ये या योग महोत्सवाची अधिकृत नोंद झाली आहे.

लोणारच्या प्राचिन भूमीवर एक नवा कीर्तिमान प्रस्थापित झाला आहे.या 'योग महोत्सवात' ६ हजार योगसाधकांनी एकाच वेळी 'त्रिकोणासन' ची साधना केली.

हा विक्रम केवळ आपल्या योगशक्तीचे प्रतीक नाही, तर पंतप्रधान यांच्या 'स्वस्थ भारत, विकसित भारत' हा संकल्प सिद्ध करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे मत केद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले. रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव यांना देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT