Fraud  file photo
बुलढाणा

Buldhana Dhanlaxmi Urban Fraud | धनलक्ष्मी पतसंस्थेतील अपहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

ठेवीदारांच्या रकमेचा संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संगनमताने कथित अपहार केल्याच्या तक्रारी

पुढारी वृत्तसेवा

Dhanlaxmi Urban Cooperative Fraud

बुलढाणा : शहरातील धनलक्ष्मी महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या बचत ठेवींच्या कथित अपहारप्रकरणी पतसंस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे पतसंस्था वर्तुळासह सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासात ठेवींच्या कथित अपहाराची व्याप्ती मोठी असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (MPID Act), १९९९ मधील कलम ३ अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू आहे.

धनलक्ष्मी महिला पतसंस्थेतील ठेवीदारांच्या रकमेचा संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संगनमताने कथित अपहार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान, या पतसंस्थेत ज्या ठेवीदारांच्या रकमा अडकल्या आहेत, त्यांनी आपल्या ठेवींच्या पावत्या तसेच संबंधित कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, बुलढाणा येथे प्रत्यक्ष हजर राहून नोंद करावी, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. रोकडे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT