बुलढाणा

Amravati News | अमरावतीला मिळाल्या नव्या महिला विभागीय आयुक्त; नयना गुंडे यांची नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा : अमरावती विभागाच्या प्रशासकीय नेतृत्वात मोठा बदल झाला असून, राज्य शासनाने श्रीमती नयना गुंडे यांची अमरावती विभागीय आयुक्त पदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी त्या पुणे येथे महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांची बदली आता मुंबई येथे 'महामुंबई मेट्रो कॉर्पोरेशन'च्या कार्यकारी संचालक पदी करण्यात आली आहे.

नयना गुंडे यांचा प्रशासकीय प्रवास

२००८ च्या बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असलेल्या नयना गुंडे यांचा दांडगा अनुभव अमरावती विभागासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यांच्या कारकिर्दीतील सुरुवात: १९९२ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून शासन सेवेत प्रवेश, पदोन्नती: २००७ मध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती, महत्त्वाची पदे: * सीईओ, जिल्हा परिषद (वर्धा). अप्पर आयुक्त, नागपूर महानगरपालिका. जिल्हाधिकारी, गोंदिया. आदिवासी विभाग आयुक्त, नाशिक. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, PMPML (पुणे) असे काही महत्त्वाचे टप्पे होते.

सांगली, सोलापूर आणि धाराशिव यांसारख्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर यशस्वीपणे सेवा बजावली आहे. श्रीमती गुंडे यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर आणि पुणे यांसारख्या शैक्षणिक केंद्रांमध्ये झाले आहे. त्यांच्या या विविधांगी अनुभवामुळे विभागातील प्रशासकीय कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT