विदर्भ

बुलढाणा : ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून लुबाडणारी टोळी जेरबंद

अविनाश सुतार

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा: एका माजी सरपंचाला तुमचा व्हिडिओ काढल्याची धमकी देऊन विवाहितीने  ब्लॅकमेल करत लुबाडले होते. अशा प्रकारे पूर्वनियोजित कट रचून लुबाडणारी बुलढाणा शहरातील टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. कृष्णा भास्कर पवार (वय 24), अजय सुनिल विरशीद (वय 22), रूपेश शंकर सोनवणे (वय 22), संतोष सखाराम जाधव (वय 35) आणि एक सतरा वर्षीय तरूण, विवाहित तरूणी (सर्व रा. बुलढाणा शहर) अशा अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा शहरातील एका 23 वर्षीय विवाहितेने माजी सरपंच यांना शनिवारी फोन केला. त्यांना भेटण्यासाठी बोलावून घेतले. त्यानुसार चिखली रोडवरील एका डीटीएड कॉलेजजवळील टिनशेडमध्ये ते भेटण्यासाठी गेले.  विवाहितेने तिच्या अंगावरील कपडे उतरवले. यावेळी शेजारी दबा धरून बसलेल्या ५ जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी माजी सरपंचाला घेरले आणि आम्ही तुमचा व्हिडीओ काढला आहे. एक लाख रूपये द्या, अन्यथा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी दिली. यावेळी त्यांच्या खिशातील ५ हजार ५०० रूपये काढून घेऊन मारहाण केली.

या प्रकरणी माजी सरपंचांनी बुलढाणा शहर पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर डीबी पथकाचे पोलीस निरीक्षक निलेश लोधी, पीएसआय माधव पेठकर यांच्या पथकाने काही तासातच सर्व आरोपींना अटक केली. तपास ठाणेदार प्रल्हाद काटकर करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT