बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा : पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना संपर्क प्रमुख व खासदार प्रतापराव जाधव व जिल्ह्यातील अन्य ७ पदाधिका-यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
१९ जुलै रोजी खासदार जाधव यांच्यासह शिवसेनेच्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देत असल्याचे पत्र लोकसभा सभापतींना दिले आहे.
खा. जाधव यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर जिल्ह्याच्या घाटाखालील भागाचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांनी काही शिवसेना पदाधिका-यांसह पत्रकार परिषद घेऊन आम्ही खासदार प्रतापराव जाधवांच्या सोबत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख व खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा प्रमुख शांताराम दाणे (मलकापूर जळगाव जामोद विधानसभा) उपजिल्हा प्रमुख राजू मिरगे, उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, नांदूरा तालुका प्रमुख संतोष डिवरे, मलकापूर तालुका प्रमुख विजय साठे, शेगाव तालुका प्रमुख रामा थारकार यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?