नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेले 'माझी वसुंधरा अभियान 3.0' सन्मान सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडला. यात राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महसूल विभाग या गटात नागपूर विभागाला क्रमांक तीनचा पुरस्कार प्राप्त झाला. तसेच नागपूर विभाग स्तरावर नागपूर जिल्हाधिकारी तर जिल्हा परिषदेअंतर्गत गोंदियाला सर्वोत्तम कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नागपूर महसूल विभागाच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचा मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
नागपूर विभागात 1 लक्ष ते 3 लक्ष लोकसंख्या गटात वर्धा नगरपरिषदेला 2 कोटी रुपये, 50 हजार 1 लक्ष लोकसंख्या गटात उमरेड नगरपरिषदेला 1 कोटी 50 लक्ष रुपये , 25 ते 30 हजार लोकसंख्या गटात देसाईगंज नगरपरिषदेला 1 कोटी 50 लक्ष रुपये, 15 ते 25 हजार लोकसंख्या गटात पवनी नगरपरिषद व खापा नगरपरिषद यांना प्रत्येकी 1 कोटी 50 लक्ष रुपये तसेच ग्रामपंचायत गटांतर्गत दावलमेटी ग्रामपंचायत, कारंजा ग्रामपंचायत, वडेगाव ग्रामपंचायत, आनंदवन ग्रामपंचायत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.