चंद्रपूरातील दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगाराला अटक केली.  Pudahri File Photo
विदर्भ

चंद्रपूरातील दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार अटकेत

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूरातील दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला आज शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या सराईत चोरट्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या.

आज रविवारी रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने पेट्रोलिंग सुरू असताना, सराईत गुन्हेगार सुमोहीत उर्फ गोलू हा बिनाकागदपत्राची एक काळया रंगाची दुचाकी घेवून संशयास्पद स्थितीत फिरत होता. विक्री करण्याच्या उद्देशाने अनाेळखी व्यक्ती खिडकी जवळ चंद्रपुर परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली. घटना स्थळी स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने त्याच्या ताब्यात असणाऱ्या दुचाकीच्या कागदपत्राची तपासणी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे देवून वाहनाचे कागदपत्र नसल्याचे सांगितले. या घटनेनंतर त्याची कसून चौकशी केली असता सदर दुचाकी चार दिवसापूर्वी सांयकाळी अयमप्पा मंदीर तुकूम येथून चोरल्याचे सांगितले. आणखी इतर ठिकाणावरून तीन दुचाकी चोरल्याचे त्याने कबूल केले. या सर्व दुचाकी पशुवैदयकिय दवाखानाच्या पार्किंग मध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या सर्व मोटासायकल ताब्यात घेण्यात घेतल्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाकी 1लाख 20 हजार रुपये किमतिच्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT