Bhandara Electrocution Death
भंडारा: गिजरच्या वायरमधून पसरलेल्या करंटच्या धक्क्याने ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आसगाव येथे घडली. इंदिरा रूपचंद घरत (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे.
इंदिरा घरत या घरातील बाथरुममध्ये आंघोळ करत होत्या. बराच वेळ होऊनही त्या बाहेर न आल्याने त्यांचे पती रूपचंद बुधाजी घरत (वय ५०) यांनी त्यांना आवाज दिला, मात्र आतून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पतीने बाथरुमचा दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला.
त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावून घराचा मुख्य वीज पुरवठा बंद केला. शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता इंदिरा बेशुद्ध् अवस्थेत पडल्याचे दिसून आले. बाथरुममधील गिजरची वायर तुटलेली असल्याने संपूर्ण बाथरुममध्ये करंट पसरला होता.