Accident  Pudhari
भंडारा

Bhandara Accident : ट्रॅक्टरच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर, चिखली फाट्यावर भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : ट्रॅक्टरला धडकल्याने दुचाकीवरील पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. १९) सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चिखली फाट्यावर घडली. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी महिलेला भंडारा शासकीय रुग्णालयात दाखल केले. आरोपी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद भोजराज घाटोडे रा. मोहाडी (गौरी) ता. मौदा असे मृताचे नाव असून अश्विनी प्रमोद घाटोडे (४०) गंभीर जखमी आहे.

प्रमोद घाटोडे हे त्यांची पत्नी अश्विनी यांच्यासोबत दुचाकीने बोरगावमार्गे प्रवास करत होते. त्याचवेळी, भंडारा तालुक्यातील नांदोरा गावचा रहिवासी असलेला ट्रॅक्टर चालक हंसदीप कृष्णा डोंगरे हा ट्रॅक्टर चिखली गावाकडे नेत होता. चिखली फाट्यावर दोन्ही वाहनांची टक्कर झाली, यात दुचाकी चालक प्रमोद घाटोडे रस्त्यावर कोसळले. ट्रॅक्टरच्या चाकाची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेली त्यांची पत्नी अश्विनी गंभीर जखमी झाली. आरोपी ट्रॅक्टर चालक हंसदीप कृष्णा डोंगरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT