Bhandara Nagpur Highway Accident ST Bus Tipper Collision
भंडारा: नागपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टिप्परने अचानक ब्रेक मारल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटून एसटी बस टिप्परवर आदळली. या भीषण अपघातात बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. बस चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेला प्रवासी गंभीर जखमी झाला. प्रकाश शेंद्रे ( वय ६२) असे गंभीर जखमी प्रवाशाचे नाव आहे. तर अन्य ३० प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खरबी नाका येथील चिखली फाट्यावर बुधवारी (दि.२८) रात्रीच्या सुमारास घडली.
अपघातग्रस्त बस ही छत्तीसगडच्या राजनांदगाव येथून प्रवाशांसह भंडारामार्गे नागपूरकडे निघाली होती. बसमध्ये एकूण ६२ प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात १ प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तर ६१ प्रवाशांपैकी ३० प्रवासी किरकोळ जखमी असून उर्वरित प्रवाशी सुखरूप बचावलेत. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी फरार टिप्पर चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.