चक्क पोलिस पाटीलच निघाला खुनी!  Pudhari
भंडारा

Police Patil Murderer | चक्क पोलिस पाटीलच निघाला खुनी!

मनोरुग्णाची केली हत्या

पुढारी वृत्तसेवा

Bhandara Crime

भंडारा : लाखांदूर तालुक्यातील विरली येथील एका मनोरुग्ण तरुणाच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण पोलिसांनी २४ तासांत उलगडले आहे. विटांनी हल्ला करून एका पोलिस पाटलांसह पाच जणांनी मानसिक रुग्ण तरुणाची हत्या केली. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. रविवारी सकाळी विरली(खुर्द) गावात संशयास्पद स्थितीत तरुणाचा मृतदेह आढळला. सोमवारी आरोपींना अटक करण्यात आली.

मृत तरुणाचे नाव बुद्धीवान धनविजय (३५) आहे, तो विरली(खुर्द) गावातील रहिवासी होता. तो मानसिक रुग्ण होता. आरोपींमध्ये पोलिस पाटील योगेश राऊत (४३), अजय मेश्राम (३०), सौरभ प्रधान (१९), रामेश्वर ठाकरे आणि लोकेश ठाकरे (२६) यांचा समावेश आहे. लाखांदूर पोलिसांनी या आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

बुद्धीवान धनविजय काही वर्षांपासून मानसिक आजारी होता. त्याने स्थानिक महिला आणि नागरिकांना त्रास दिल्याचा आरोप आहे. शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी पोलिस पाटील योगेश राऊत विरली(खुर्द) येथील पानाच्या दुकानावर बसला होता. घटनेदरम्यान, बुद्धिवाणने पोलिस पाटील यांच्याशी वाद सुरू केला आणि त्यांच्यावर दगड आणि विटा फेकल्या. अपमान आणि हल्ल्यामुळे पोलिस पाटील संतापले. त्याने आणि इतर आरोपीनी संधी साधली आणि बुद्धिमानला काठीने मारहाण केली.

गंभीर जखमी झालेल्या बुद्धीवानचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, लाखांदूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा तयार केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या तपासादरम्यान, मृताच्या पायावर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा आढळल्या. यामुळे हत्येचा संशय निर्माण झाला आणि पोलिसांनी सखोल तपास केला. पोलीस अधिकारी सचिन पवार, आशिष गंद्रे, उपनिरीक्षक निशांत जानोंकर आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आणि त्यांनी त्यांचे गुन्हे कबूल केले. त्यानंतर, पोलिस पाटीलसह इतर पाच आरोपींना अटक करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT