भंडारा पोलिस स्टेशन हद्दीत बेलाजवळ झालेल्या भीषण अपघातात कारचा झालेला चक्काचूर  Pudhari
भंडारा

Bhandara Accident | नागपूरहून परतताना कारचा भीषण अपघात; अड्याळचा तरुण ठार

तिर्री गावातील चार मित्र गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Bhandara road accident

भंडारा:
नागपूर येथून गावी परतणाऱ्या तरुणांच्या कारला भंडारा पोलिस स्टेशन हद्दीत बेलाजवळ भीषण अपघात झाला. अनियंत्रित कार पलटल्याने अड्याळ परिसरातील सोनू उर्फ चंद्रकांत डोंगरे या तरुणाचा मृत्यू झाला. त्याचे अन्य चार मित्र गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे तिर्री आणि अड्याळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अड्याळजवळील तिर्री गावात सोमवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली काढण्यात आली होती. ही रॅली आणि गावातील जेवण आटोपून सोनू उर्फ चंद्रकांत डोंगरे आपल्या पाच मित्रांसह अल्टो कारने नागपूर येथील मुख्य सोहळा पाहण्यासाठी रात्री १० ते १०:३० च्या दरम्यान रवाना झाला होता. नागपूरमधील कार्यक्रमाचा आनंद घेत असताना या तरुणांनी सोशल मीडियावर उत्साहाचे ‘स्टेटस’ देखील ठेवले होते. मात्र, गावी परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.

बेलाजवळ झालेल्या या भीषण अपघातात कारमधील अन्य चार मित्र गंभीर जखमी झाले आहेत. यात साजीद मुस्तफा पठाण (१८, रा. अड्याळ), क्रिश भिवाजी जिभकाटे (१९, रा. चिचाळ), अभिषेक दीपक बंसोड (३०, रा. तिर्री), आयुष भास्कर कावळे (२४, रा. तिर्री) यांचा समावेश आहे.

ग्रामस्थांची रुग्णालयात धाव
अपघाताची बातमी वाऱ्यासारखी तिर्री आणि अड्याळ परिसरात पसरली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे धाव घेतली. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT