MP Prashant Padole injured
भंडारा: मुंबईमार्गे भंडाऱ्याकडे परतत असताना खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला आज (दि.११) पहाटे भीषण अपघात झाला. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ सकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या अपघातात खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या फॉर्च्युनर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेच्या वेळी वाहनात खासदार स्वत: उपस्थित होते. दिल्लीवरुन ते विमानाने मुंबईला पोहचले. तेथे कार्यालयीन काम पूर्ण केल्यानंतर आपल्या वाहनाने भंडाºयाकडे परतत होते. तेव्हा नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ अचानक समोरून आलेल्या वाहनामुळे संतुलन बिघडले आणि जोरदार धडक बसली. अपघात गंभीर असला तरी डॉ. प्रशांत पडोळे व वाहनातून प्रवास करीत असलेले सहकारी सुखरूप आहेत.