Nagpur Raipur highway accident elderly man killed
भंडारा: नागपूर-रायपूर महामार्गावरील भिलेवाडा फाट्यावर भरधाव टिप्परने सायकलला धडक दिल्याने सायकलस्वार गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि. १३) सकाळच्या सुमारास घडली. जयलास किसन टांगले ( वय ६५, रा. सालेबर्डी ता. भंडारा) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयलास हे कारध्यावरुन भिलेवाड्याकडे सायकलने जात असताना खमारीकडून भिलेवाड्याकडे येणाऱ्या टिप्परने त्यांच्या सायकलला जबर धडक दिली. यात जयलास यांच्या छातीला व पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकेद्वारे जखमीला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अधिक रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारधा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.