भंडारा, पुढारी वृत्तसेवा : तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी-बोनकाट्टा राज्य महामार्गावरील पाथरी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील ३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Bhandara Accident News)
सोमवारी (दि. २१) रात्री ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान, (एमएच ४० टी ९४२०) या मोटारसायकलवरून लग्न समारंभ आटोपल्यावर बोनकट्टाहून नाकाडोंगरी रस्त्याने चिखला गावाकडे जात असताना ही घटना घडली. मृतांमध्ये पती, पत्नी आणि एका ५ वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे.
अपघात झाल्यावर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला. तक्रारदार विजय सोमा कंगाली यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गोबरवाहीचे ठाणेदार शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल मंगेश पेंदाम आणि तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती गीते पुढील तपास करत आहेत.