वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू झाला. File photo
भंडारा

भंडारा : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

कवलेवाडा शेतशिवारातील घटना

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : शेतात काम करीत असताना अचानक वाघाने हल्ला करुन महिलेला ठार केले. ही घटना आज (दि.२९) भंडारा तालुक्यातील कवलेवाडा शेतशिवारात संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण आहे. धृपता उर्फ नंदा किसन खंडाते (वय ५०, रा. कवलेवाडा) असे मृत महिलेचे नाव आहे.

धृपता आपल्या शेतात तूर कापण्यासाठी गेली होती. परंतु संध्याकाळ होऊनही ती परतली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी शेतात जाऊन पाहिले असता तिची चप्पल आढळली. तसेच तिला २०० मिटरपर्यंत खेचून नेल्याचे दिसून आले. लागलीच ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. तात्काळ याची माहिती वन विभागाला देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT