अपघाताला कारणीभूत बपेरा-सिहोरा-तिरोडा एसटी बस. Pudhari Photo
भंडारा

भंडारा : एसटीच्या चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू

Bhandara Accident News | वाहनी गावातील घटना: सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

भंडारा: एसटी बसच्या चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तुमसर तालुक्यातील वाहनी येथे आज १६ मार्च रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. मीना ओमेश्वर कळू (३२) रा. चिखला ता. तुमसर असे मृत महिलेचे नाव आहे.

दि. १६ मार्च रोजी तुमसर तालुक्यातील चिखला येथील ओमेश्वर कळू हा त्याची पत्नी मीना आणि दोन लहान मुलींसोबत दुचाकी क्र. एम.एच.३६ ए. ४०१ ने तिरोडा तालुक्यातील सरांडी येथून आपले घरी चिखला माईन्स येथे जात होता. वाहनी येथील पाण्याच्या टाकीजवळ सिहोराकडून येणारी एस.टी.बस क्र. एम.एच.०६ एस.८८६० समोरुन रस्त्याने येत होती. दरम्यान ओमेश्वर कळू याने दुचाकी रस्त्याच्या खाली घेवून जाताना दुचाकी शेणावरुन गेल्याने दुचाकी स्लीप झाली. त्यामुळे ओमेश्वर व दोन मुले रस्त्याच्या डाव्या बाजुला पडले. तर मीना ही उजव्या बाजुला पडल्याने एसटी बसच्या चाकाखाली आली. एसटीचे चाक तिच्या डोक्यावरुन गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

फिर्यादी ओमेश्वर कळू याने सिहोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन ठाणेदार विजय कसोधन यांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हरिदास सुरपाम करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT