भंडारा: जंगलातील अधिवासाच्या क्षेत्रातील अस्तित्वाच्या लढाईत दोन बिबट्यांमध्ये कडवी झुंज झाली. यात मोठ्या बिबट्याने ६ महिन्याच्या लहान मादी बिबट्याला गंभीर जखमी केल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी सकाळी लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी सहवन क्षेत्रातील बोंडगाव देवी जंगल परिसरात घडली.
गंभीर जखमी अवस्थेतील बिबट्या रस्त्याच्या कडेला नागरिकांना दिसला. याची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी त्याला तातडीने रेस्क्यू करत लाखांदूर येथील तालुका पशुवैद्यकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. अश्विनी चौधरी, डॉ. प्रवीण सोनवाने यांनी वैद्यकिय तपासणी करून पुढील उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आले आहे. यावेळी दिघोरी मोठीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सय्यद, वनरक्षक मंजल वाढ, वनरक्षक नागरगोजे, पवळे, आगासे उपस्थित होते.