भंडारा: तुमसर-बपेरा राज्य मार्गावर असलेल्या खैरलांजी पुलावरून पावर प्लांटची निष्क्रिय बुकटी घेऊन दावेझरी गावाकडे जात असलेला टिप्पर क्रमांक एमएच ३६/एए ३१२१ हा पुलावरून खाली कोसळला.
या अपघातात वाहक जागीच ठार झाला, तर चालक हा गंभीर जखमी झाला. जखमीला तुमसरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना आज २५ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. मृतक वाहकाचे नाव जितु सयसपुर असे असून चालकाचे नाव आकाश बारबैले (रा. सरांडी तह. तिरोडा जि. गोंदिया) असे सांगितले जात आहे. सदर घटनेचा पुढील तपास तुमसर पोलिस करीत आहेत.