भंडारा

Bhandara Tiger Death : वाहनाच्या धडकेत पट्टेरी वाघ ठार, भंडारा जिल्ह्यातील गडेगावजवळ महामार्गावर भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील गडेगाव परिसरात घडली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

गडेगाव परिसर हा नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कोका अभयारण्यालगत असल्याने या भागात वन्यप्राण्यांची नेहमीच वर्दळ असते. महामार्ग ओलांडत असताना भरधाव वाहनाने वाघाला जबर धडक दिली. या भीषण अपघातात वाघ जागीच ठार झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, पुढील कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रिया सुरू केली आहे.

वन्यजीवांच्या अधिवासालगत गेलेल्या महामार्गांवर वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्याची गरज या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या घटनेबद्दल वन्यजीवप्रेमींमधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT