भंडारा

भंडारा : संत्र्याच्या आड गांजाची तस्करी, तिघांना अटक

backup backup

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : भंडारा मार्ग येथून एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर गांजा जाणार असल्याची मिळताच पोलिसांनी सापळा रचला व कापली पुलाजवळ एमएच १३ एएक्स ४८६६ क्रमांकाचे वाहनाला रोखले. पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये संत्र्याच्या कॅरेटच्या खाली ९ प्लास्टिकचे पोते आढळले. त्यात सुमारे ३९ लाख ९७ हजार ४८० रुपये किमतीचा १९९ किलो ८७४ ग्रॅम गांजा होता. पोलिसांनी शेख अल्ताफ शेख सलीम (वय ३६, रा. मोठा ताजबाग), प्रमोद दिलीप कळने (वय ३०) रा टिपू सुलतान चौक, यषोधरानगर आणि अक्षय विनोद शेंडे (वय २४) रा. यादव नगर, यशोधरानगर यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून ३ मोबाईल व प्लास्टीक कॅरेड आणि ट्रक असा एकूण ५६ लाख १६ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीनही आरोपींविरोधात पारडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राहुल शिरे, विक्रांत थारकर, पंकज भोपळे, रोठे, कोहळे, राजेश लोही, प्रमोद वाघ, टप्पुलाल चुटे, निखील जामगडे, राजेंद्र टाकळीकर, विशाल नागभिडे, सुधीर तिवारी, अमोल भक्ते यांच्या पथकाने केली.

SCROLL FOR NEXT